सुरक्षा रक्षकांनीच केला घात; सुरक्षा रक्षकांकडून 19 वर्षीय तरुणाची हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – मीरा भाईंदर या ठिकाणी एक अशी घटना उघडकीस आली आहे त्यामध्ये सोसायटीचे रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनी सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करत हत्या केली आहे. हा मुलाचा सुरक्षारक्षकांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. ह्या वादाचा राग मनात धरून आरोपी सुरक्षा रक्षकांनी या मुलाची हत्या केली आहे. मुलगा जखमी झालेला पाहून ते घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणी काशी मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना मीरा रोडच्या सृष्टी सेक्टर 1 याठिकाणी घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या मुलाचे नाव अभिषेक सिंग आहे. तो 19 वर्षांचा होता. अभिषेक या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होता.अभिषेक हा सिंग दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता.सिंग यांच्या एकुलत्या एक मुलाची किरकोळ कारणातून हत्या करण्यात आल्याने सोसायटीतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत अभिषेक याचा काही दिवसांपूर्वी आरोपी सुरक्षा रक्षक सुभाष पांडे आणि अजित तिवारी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

यामुळे मागील काही दिवसांपासून सुरक्षा रक्षक आणि मृत अभिषेक यांच्यांत खुन्नस निर्माण झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या मनात अभिषेकबद्दल खुप राग होता. यादरम्यान काल रात्री साडे बाराच्या सुमारास मृत अभिषेक आणि संबंधित सुरक्षा रक्षक यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अभिषेकच्या पोटात चाकू भोकसून त्याची हत्या केली. अभिषेक जखमी झालेला पाहून ते घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच अभिषेकच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाशांनी अभिषेकला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आज सकाळी त्याने साडे नऊच्या सुमारास उपचारादरम्यान अभिषेकने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी मृत अभिषेकच्या वडिलांनी काशी मीरा पोलीस ठाण्यात सुभाष पांडे आणि अजित तिवारी या दोन सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दखल केला आहे. हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास काशी मीरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.