शिख नेते रिपुदमन यांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या, एअर इंडिया फ्लाईट ब्लास्टप्रकरणात गोवले होते नाव

ripudaman singh malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये शीख नेते रिपुदमन सिंग मलिक (ripudaman singh malik) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री हि घटना घडली आहे. त्यांची (ripudaman singh malik) नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. दुचाकीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी आधी त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रिपुदमन (ripudaman singh malik) यांची कार जाळली.

1985 च्या कनिष्क बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले कॅनडाचे शीख नेते आणि पंजाबी वंशाचे व्यापारी रिपुदमन सिंग मलिक (ripudaman singh malik) यांची कॅनडातील सरे या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते त्यांच्या कारमधून जात असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये रिपुदमन यांचा जागीच मृत्यू झाला.

कोण आहे रिपुदमन ?
रिपुदमन सिंग मलिक (ripudaman singh malik) हे पंजाबी वंशाचे कॅनडाचे शीख नेते होते. त्यांचे नाव 1985 च्या एअर इंडिया फ्लाइट बॉम्बस्फोटात आलं होतं, परंतु नंतर 2005 मध्ये या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 22 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या विमानाने कॅनडाहून दिल्लीला उड्डाण केलं. आयरिश एअर स्पेसमध्ये या विमानाचा स्फोट झाला आणि विमानातील 22 क्रू सदस्यांसह 331 प्रवासी या स्फोटामध्ये मरण पावले होते. मृतांपैकी बहुतांश भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक होते. या प्रकरणी रिपुदमन सिंग मलिक (ripudaman singh malik) यांना आरोपी मानण्यात आले होते. मात्र घटनेच्या 20 वर्षांनंतर ते निर्दोष ठरले आणि 2005 मध्ये त्यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार