गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये भारतीय लष्कराकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. डचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये (maoists) मोठी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी दोन जहाल माओवाद्यांना (maoists) यमसधनी धाडले आहे. या दोन्ही जहाल माओवाद्यांवर (maoists) 16 लाख रुपयांचे बक्षीस होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सिकसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी आणि जवानांमध्ये मोठी चकमक उडाली. कडमेच्या जंगलात पोलिसांचे माओवाद्याविरोधी (maoists) अभियान सुरू असतांना माओवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन माओवाद्याचा जागीच मृत्यू झाला. मृतकामध्ये माओवाद्याच्या एक्शन टीमचा कमांडर जागेश सलाम आणि विभागीय समिती सदस्य दर्शन पद्दाचा समावेश आहे.
मागच्या महिन्यात तेलंगणाच्या वारंगल येथे उपचारासाठी आलेल्या तीन माओवाद्यासह एका काँग्रेस नेत्याला पोलिसांनी अटक केली होती. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून छत्तीसगडचा भोपालपटणम तालुक्यातून उपचारासाठी माओवाद्याच्या वैद्यकीय चमुची कमांडर असलेली मदकम उनगी उर्फ कमला आणि माओवादी (maoists) असम सोहेन याच्यासह मीका अनिता या तिघांसोबत घेऊन काँग्रेसचे तालुका महासचिव कोंडागोर्ला सत्यम वारंगल शहरात आले होते. याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत काँग्रेस नेत्यासह तीन माओवाद्यांना अटक केली. यावेळी त्या माओवाद्यांकडून पन्नास जिलेटीनच्या कांडया,पन्नास डेटोनेटर आणि 74 हजार रोख रक्कम जप्त केली होती.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी