वाद मिटवायला जाणे आले अंगलट, आरोपींनी डोक्यात दगड घालून पोलिसालाच केलं रक्तबंबाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खालापूर : हॅलो महाराष्ट्र – खालापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी काही तरुणांचे भांडण चालले होते. यावेळी या तरुणांनी एका पोलिसावरच हल्ला केला. संबंधित पोलीस आरोपींचा वाद मिटवण्यासाठी गेले होते. यावेळी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या दोन जणांनी पोलिसाच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. हे आरोपी तरुण एवढयावरच थांबले नाहीतर त्यांनी पोलिसाच्या हातातील सरकारी कागदं देखील फाडून टाकले आहेत. यानंतर संबंधित पोलिसानं दोन्ही आरोपीविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सोमनाथ तांदळे असं फिर्यादी पोलिसाचं नाव असून तो खोपोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हि घटना घडली तेव्हा पोलीस सोमनाथ तांदळे हे आपल्या कार्यलयीन कामानिमित्त समन्स बजावण्यासाठी मुकुंदनगर भानवज परिसरात गेले होते. त्यावेळी आरोपी धनराज सुरेश जंबगी आणि रामराज सुरेश जंबगी हे दोघे एकमेकांशी भांडत होते. भरस्त्यावर हे दोघे एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यांच्यातील हा वाद वाढत चालल्याचं पाहून फिर्यादी पोलीस सोमनाथ तांदळे यांनी तो वाद सोडण्याचाच प्रयत्न केला मात्र काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसणाऱ्या रामराज आणि धनराज यांनी पोलीस तांदळे यांच्यावरच हल्ला केला.

या आरोपींनी तांदळे यांच्या डोक्यात दगड घातला तसेच सिमेंटचा पत्रा मारून त्यांना जखमी केले. हे आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तांदळे यांच्याजवळील शासकीय कामकाजाचे काही कागपत्रेसुद्धा फाडले. या घटनेनंतर तांदळे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांदळे यांनी आरोपीवर मारहाणीसह खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment