हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : IDFC First Bank आणि Bandhan Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. IDFC फर्स्ट बँकेकडून 2 कोटी ते 25 कोटी रुपयांच्या FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बंधन बँकेनेही 2 कोटी आणि त्याहून जास्त रकमेच्या एफडीवर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेकडून एफडीवर 7.80 टक्के व्याज दर दिला जाईल. 26 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. FD Rates
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, IDFC फर्स्ट बँकेकडून आता 366 दिवस ते 731 दिवसांच्या 2 कोटी ते 25 कोटी रुपयांच्या FD वर 7.10% व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, आता ग्राहकांना 732 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 7 टक्के, 271 दिवस ते 365 दिवसांच्या FD वर 6.85%, तर 181 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 6.45% व्याज मिळेल. FD Rates
या कालावधीसाठी मिळेल जास्त व्याज
आता बँकेकडून 92 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 6.35% ,61-91 दिवसांच्या FD वर 5.60% आणि 46-60 दिवसांच्या FD वर 5.05% व्याज दर दिला जाईल. त्याचबरोबर आता बँकेकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 4.70% ते 4.95% व्याज दर दिला जाईल. FD Rates
बंधन बँकेनेही व्याजदरात केली वाढ
बंधन बँकेने 2 कोटीं ते 50 कोटी आणि त्याहून जास्तीच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता या बँकेकडून 365 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.25% व्याज दर देण्यात येईल. तसेच आता बँक 15 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.15%, 5 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 5% , 91 दिवसांपासून ते 364 दिवसांच्या FD वर 6%, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 5.05% व्याज मिळेल. तसेच आता बँकेकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.25% ते 3.75% व्याज दर दिला जात आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://bandhanbank.com/rates-charges
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 259% रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी