सातारा- रहिमतपूर रोडवर अपघातात 2 जण जागीच ठार, एक गंभीर

Accident Two Wheeler Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा- रहिमतपूर रस्त्यावरील शहरालगत दत्तनगर कॅनॉल परिसरात प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकींचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये एक जण जखमी झाला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी, हा अपघात गुरुवारी झाला. मुख्य रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली. कारण मुख्य रस्त्यावरच दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होती.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वाहतुक सुरळीत करुन घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. अपघातात तिघांचा समावेश असल्याने त्यांना रुग्णालयात हलवले असता दोघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.