व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

2 रुपयांचे जुने नाणे तुम्हांला लाखोंचा मालक करेल; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सध्या अनेक जणांचे नोकरीचे वांदे झाले आहेत, तर दुसरीकडे दैनंदिन गरज भागवण्यासाठी पैसा तर जवळ असायलाच पाहिजे. आधीच महागाई गगनाला भिडलेली असल्याने जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे याचा विचार आपण करत असतो. तुम्ही सुद्धा पैशाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडियाची कल्पना सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फक्त २ रुपयांमध्ये लखपती बनू शकता आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकता.

जगभरात असे अनेकजण असतात ज्यांना जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असतो. त्यासाठी ते कोणतीही रक्कम मोजायला तयार असतात. त्यामुळे ही गोष्ट तुमच्यासाठी पैसा कमवण्याची सुवर्णसंधी ठरू शकते. जुनी आणि दुर्मिळ नाणी विकून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. जर तुमच्याकडे 1994, 1995, 1997 किंवा 2000 च्या सीरिजची 2 रुपयांची नाणी असतील तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. होय हे खरं आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते नाणे विकावं लागेल.

2 रुपयांची जुनी नाणी विकण्यासाठी काय करावं?

1) 2 रुपयांची जुनी नाणी विकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Quikr नावाच्या ऑनलाइन साइटला भेट द्यावी लागेल.
2) यानंतर, विक्रेता म्हणून रेजिस्ट्रेशन करावं लागेल.
3) तुमच्याकडे जे नाणे आहे, त्याच्या दोन्ही बाजूनी फोटो काढून अपलोड करावा लागेल.
4) यांनतर तुमचा फोन नंबर आणि ईमेल आयडी टाका.
5) कंपनीकडून तुमचे सर्व डिटेल्स approve केले जातील
6) त्यानंतर ज्याला हे नाणं पाहिजे ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल
7) मग योग्य रक्कम निश्चित करून तुम्ही हे नाणं विकू शकता.