सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 364 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 142 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 510 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 53 हजार 751 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 28 हजार 773 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3456 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 31 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटर कामकाजासाठी बॅंका खुल्या राहणार
दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.




