शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांचे हे सरकार खोक्यातून निर्माण झालं आहे. आज नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवलं गेलं आहेत. त्यांची अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. ते मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील. एका चिन्हासाठी ही रक्कम लहान नाही. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला असल्याचा मोठा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाहीये. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे. दोन हजार कोटीच्या या व्यवहाराचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देत आहे.

आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. 2000 कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे. ते कुठे बसलेत ते सर्वांना माहीत आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रात अशी चाटूगिरी कधीच झाली नाही

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काय करत आहेत. ते काय चाटत आहेत. अशा प्रकारची चाटूगिरी कधीच झाली नाही अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.