औरंगाबाद – कोरोना नंतर या महिन्यात पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, आता लगेच दिवाळीसाठी शाळांना 1 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर अशा वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील.
तसेच ज्या शाळांना नाताळ च्या सुट्ट्या द्यायच्या असतील, त्यांनी दिवाळी सुट्टी कमी करून नाताळ च्या सुट्ट्या समायोजित करण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने घ्यावा.
राजमाता जिजाऊ जयंती चे महत्व लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारातील सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर करावी, असे गट शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्व जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी कळविले आहे.