2024 वर्षात असेल मनोरंजनाचा ‘फुल टू धमाका’! रिलीज होणार या दमदार वेब सिरीज

Web Series
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनोरंजनाच्या दृष्टीने 2024 वर्ष प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण 2024 वर्षात प्रेक्षकांच्या भेटीसाठी अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळेल. नव्या वर्षात नेमक्या कोणत्या वेबसिरीज रिलीज होतील, यावर एक नजर टाकुयात.

आश्रम 4 (Aashram 4) – बहुचर्चित असणाऱ्या आश्रम सिरीजचे तीन भाग रिलीज झाले आहेत. आता या सिरीज चा चौथा भाग 2024 मध्ये रिलीज होणार आहे. आश्रम वेब सिरीज मध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे.

मिर्जापूर 3 (Mirzapur 3) – मिर्जापूर सिरीजने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता या सिरीजचा तिसरा भाग 2024 वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागांत आपल्याला कालीन भैया आणि गुड्डू भैयामधील भांडण पाहिला मिळतील.

पंचायत 3 (Panchayat 3) – नव्या वर्षांमध्ये पंचायतच्या तिसऱ्या भागांची मेजवानी प्रेक्षकांना मिळेल. या सिरीज चा पहिला लोक काही दिवसांपूर्वीच आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून तितका प्रतिसाद देखील मिळाला. आता तिसरा भाग येण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता पाहायला मिळत आहे.

द फॅमिली मॅन 3 (The Family Man) – मनोज वाजपेयी यांची द फॅमिली मॅन लोकांच्या मनात घर करून बसली आहे. आता या सिरीजचा तिसरा भाग 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

फर्जी – अभिनेता शाहिद कपूरने फर्जीच्या माध्यमातून ओटीपी विश्वावर पदार्पण केले आहे. त्याच्या या नव्या अवताराला प्रेक्षकांकडून देखील भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामुळे फर्जीचा पुढील भाग 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

असुर 3 (Asur 3) – रोमांचक आणि थरार असलेला असुर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. त्यामुळे या सिरीजचा तिसरा भाग 2024 मध्ये प्रदर्शित होईल.

इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) – 19 जानेवारी 2023 रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर इंडियन पोलीस फोर्स रिलीज होणार आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय दिसेल.