Wednesday, February 1, 2023

21 लाख लोकांना मिळणार रोजगार, बांधले जाणार 7 टेक्सटाईल पार्क; केंद्राकडून PM Mitra योजनेला मिळाला ग्रीन सिग्नल

- Advertisement -

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी सांगितले की,”या बैठकीत पीएम-मित्र योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेवर सुमारे 4,445 कोटी रुपये खर्च केले जातील.”

पीएम-मित्र योजनेअंतर्गत (Mega Integrated Textile Region and Apparel) देशात 7 टेक्सटाईल पार्क बांधले जातील आणि सुमारे 21 लाख लोकांना या टेक्सटाइल पार्कमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा सरकारांनी मित्रा-पार्क विकसित करण्यात रस दाखवला आहे.

- Advertisement -

पियुष गोयल म्हणाले की,”अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रावर मजबूत पकड ठेवण्यासाठी 5-F कॅप्चर करण्याबाबत चर्चा झाली. 5-एफ म्हणजे फायबर टू फार्म, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन. हे सर्व दुवे एकत्रितपणे मूल्य साखळी मजबूत करतात, मात्र आता ते सर्व वेगवेगळे आहेत.”

ते म्हणाले की,”गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस पिकवला जातो, तेथून तो तामिळनाडूला जातो, जिथे स्पिनिंग होते. यांनतर तो प्रक्रियेसाठी राजस्थान आणि गुजरातला जातो. हे कपडे दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता येथे बनवले जातात आणि निर्यातीसाठी मुंबई आणि कांडला जावे लागते. हे सर्व आता इंटीग्रेटेड पद्धतीने करता येते.”

पीयूष गोयल म्हणाले की,”पीएम मित्र योजनेअंतर्गत इंटीग्रेटेड टेक्सटाइल मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील 5 वर्षात 4445 कोटी रुपये खर्च केले जातील. या अंतर्गत देशभरात 7 टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत.”

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की,”सरकारच्या या पावलामुळे 7 लाख लोकांना प्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल.” त्यांनी सांगितले की,” टेक्सटाइल पार्क साठी राज्यांशी चर्चा सुरू आहे. राज्यात हे पार्क उभारली जातील ज्यामुळे स्वस्त जमीन, पाणी आणि मजूर सहजपणे उपलब्ध होतील. यासह, हे देखील पाहिले जाईल की टेक्सटाइलला मागणी असेल.”

पियुष गोयल म्हणाले की,”7 पार्क उभारण्यासाठी अंदाजे खर्च 1700 कोटी रुपये असेल. ज्या युनिट्स सुरुवातीला मोठी गुंतवणूक करतील, त्यांनाही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर मदत दिली जाईल. 30 कोटी रुपयांपर्यंतचे युनिट्स सरकार 3 वर्षात देऊ शकते.”

ते म्हणाले की,”हे टेक्सटाईल पार्क विविध राज्यांमध्ये असलेल्या ग्रीनफिल्ड किंवा ब्राऊनफिल्ड ठिकाणी बांधण्यात येईल. सर्व ग्रीन फील्ड पार्क विकसित करण्यासाठी 500 कोटी दिले जातील. तर ब्राउनफिल्ड पार्कच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.”