शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार; फडणवीसांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच गावातील स्ट्रीट लाईट योजनाही सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला आहे असं फडणवीसांनी सांगितलं

फडणवीस म्हणाले, 2018 साली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये जे काही एग्रीकल्चरल फिडर आहेत जे सोलर वर टाकायचे जेणेकरून दिवसा शेतकऱ्यांना वीज देता येईल. त्या काळात साधारण 200 मेगावॅटचे काम पूर्ण करण्यात आलं होतं. पण नंतरच्या काळात त्याला थोडा ब्रेक बसला. आज पुन्हा एकदा ही योजना आम्ही फास्टट्रॅकवर आणली आहे.

पुढच्या एका वर्षात किमान 30 टक्के अॅग्रीकल्चरल फिडर हे सौर उर्जेवर कसे आणता येतील जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल या संदर्भात आज निर्णय करण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेकडे आम्ही पाठवणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान दिली आहे.

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना किंवा स्ट्रीट लाईट बंद आहेत. या बिलावरील व्याज आणि चक्रवाढ व्याजमुळे एकीकडे महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात दिसते दुसरीकडे या गावांनाही अडचणीचा सामना करावा लागतो . त्यामुळे जुन्या थकबाकी बाबत महावितरण आणि राज्य सरकारने विचार करावा आणि राज्य सरकारने थकबाकी भरावी, त्या पैशातून ग्रामपंचायतीने ही थकबाकी भरावी आणि तात्काळ स्ट्रीट लाईट योजना, आणि पिण्याच्या पाण्याची योजना सुरु व्हाव्यात असा निर्णय सरकारने घेतला आहे असं फडणवीसांनी जाहीर केलं

Leave a Comment