औरंगाबाद – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरला अध्यक्षांसह नवीन कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी अध्यक्ष, महासचिवासह 9 पदासाठी 22 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पहिल्यांदाच होणारी निवडणूकी चांगली रंगतदार होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली महासंघाची आतापर्यंत सर्व निवडणूकाबिनविरोध झाल्या असून यंदाही ही परंपरा कायम राहावी, यासाठी काही ज्येष्ठ प्रयत्नशील असल्याचे समजते.
दर तीन वर्षांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, महासचिव यांच्यासह कार्यकारणीची निवड केली जाते. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपला होता. परंतू करोनाच्या संकटामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ काळे व सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी नुतन कार्यकारणी निवडीसाठी निवडणूककार्यक्रम घोषित केला आहे. यात 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली, असून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस होता.
दरम्यान काल सायंकाळ अखेरपर्यंत अध्यक्ष, महासचिव, उपाध्यक्ष यासह नऊ पदासाठी एकूण 22 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी आलेल्या अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल तर अर्ज मागे घेण्याचीमुदत 20 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.