शहरात उभी राहणार 22 मजली इमारत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. मुंबई पुण्याप्रमाणे औरंगाबादेतही उंच इमारती उभारण्यात येणार आहेत. सातारा भागातील गट क्रमांक 39 मध्ये तब्बल अडीच एकर जागेवर 22 मजली इमारत उभारण्याची परवानगी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे मागितले आहे. यापूर्वी शहरात साधारण पंधरा मजली इमारत उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्सला परवानगी दिली. या नियमावलीत शासनाने आमूलाग्र बदल केले आहेत. पूर्वी औरंगाबाद शहरात 46 मीटर पर्यंत उंच इमारतींना परवानगी देण्यात येत होती. आता शासनाने 70 मीटर पर्यंतची मुभा दिली आहे. नवीन नियमानुसार शहरात पहिल्यांदाच 22 मजली इमारत बांधण्यासाठी ए.एमटी इन्फ्रास्ट्रक्चरने पुढाकार घेतला आहे. सर्वात उंच इमारत बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती देताना उपसंचालक नगररचना ए.बी. देशमुख यांनी सांगितले की, शहरात सर्वात उंच इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सातारा परिसरातील गट क्रमांक 39 मधील अडीच एकर मध्ये सिंगल टॉवर उभारले जाणार आहेत. या इमारतीमध्ये थ्री बीएचके 88 फ्लॅट बांधले जाणार असून सर्व सोयी सुविधा मिळणार आहेत. मनपाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी केली जात असून, उपअभियंता संजय चांगले यांच्यावर प्रस्तावाची तपासणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अत्यंत बारकाईने प्रस्तावाची छाननी करून तपासणी केली जाणार असल्याचे उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी सांगितले.

Leave a Comment