चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरमधील शांतीनगर वसाहतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका साठ वर्षीय महिलेवर २२ वर्षाच्या युवकाने अत्याचार केले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर असे आहे.
आरोपी मोहम्मद हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. तो मागच्या पंधरा दिवसांपासून शांतीनगर येथील मदरसामध्ये विद्यर्जनाचे काम करत होता. तो शांतीनगर येथे पहाटे ४.३० वाजता मदरसा येथून नमाज पढून बाहेर आला. यानंतर त्याने एकटी महिला शौचालयास जात असल्याची संधी साधून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.
पीडित महिलेने याबद्दल घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी वरिष्ठांना दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीविरुद्ध कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे या करत आहेत.