चोरटयांनी गॅस कटरच्या सहाय्याने ATM फोडून 23 लाख केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत याठिकाणी चोरटयांनी एका एटीएमवर दरोडा टाकून त्यातील सर्व रोकड लंपास केली आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील 23 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. दरोड्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेत आहेत. दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या ATM वर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोरटयांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं आहे. या एटीएममधून चोरट्यांनी तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड लंपास केली आहे. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिस गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्य्यने या चोरट्यांचा शोध घेत आहेत. एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यवत पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment