हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही आत्तापर्यंत 23 हजार मुंबईकरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे बीएमसीच्या अहवालात निदर्शनास आले आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे.
०.३५ टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांमागे ३५० जणांना पुन्हा कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान, हे प्रमाण खूप कमी असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही असं आवाहन करण्यात आलं आहे.
लसीकरण होऊनही कोरोना होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जातीय, पण याच प्रमाण खूप कमी आहे, असंही मुंबई पालिकेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. परंतु ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, ही चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.