सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 428 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 9. 82 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र नव्या वर्षातील कोरोना बाधितांचा मृत्यूचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 359 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 428 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 10 टक्क्यांवर खाली आला आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात 1066 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 5219 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 321 रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ आहेत. रिकव्हरी रेट 95. 76 टक्के इतकी आहे.