गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील देवनार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाने प्रेयसीवर नाराज होत टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या मृत तरुणाचे नाव मानव ललवानी असे आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेयसीने पार्टीनंतर घरी पोहोचल्यानंतर फोन न उचलल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.

मृत तरुण आपल्या मैत्रिणीसोबत पार्टी करुन रात्री उशीरा घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर मानवने रात्री जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या प्रेयसीला फोन केला पण तिने तो उचलला नाही. यानंतर त्याने रागाच्या भरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला अशी माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोवे यांनी दिली आहे.

मानवच्या पालकांना टेरेसवर मानवचा लटकलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी मानवच्या प्रेयसीचा जबाब देखील नोंदवला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.