व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेनंतर काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा घेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करीत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असे ट्विट राऊतांनी केले आहे.

संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली असून त्यांनी थेट विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधला आहे. विरोधीपक्षनेते फडणवीसांचा उल्लेख वैफल्यग्रस्त असा करत राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे. यापूर्वीही राऊतांनी भाजपवर निशाणा साधला होता. शिवसेना कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे, असे राऊतांनी म्हंटले होते.

काय म्हणाले फडणवीस?

काल पार पडलेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा. लपवायचे कारण काय? आज माझे वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझे वजन 158 किलो होते. उद्धव ठाकरे यांना असे वाटते की, माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझे राजकीय वजन कमी होईल. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार, असे ते म्हणाले.