परभणी प्रतिनिधी |
कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 21 जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त व नियोनज मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 240 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे .
यावेळी बैठकीस पालकमंत्री नवाब मलिक ,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मिना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे उपस्थिती होते.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.
तसेच जिल्ह्यातील 275 पोखरा अंतर्गत गावे, निजामकालीन शाळांची देखभाल दुरुस्ती व नव्याने बांधणी, रुग्णालयांचे नूतनीकरण, कोव्हिड-19 विषयक सोयी सुविधा, पुतळा सुशोभीकरण, स्मशानभूमी आदीसाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्ह्याकरिता 240 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले आहेत .