पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र वनविभागाला बिबट्याचा मागमूस लागत नसल्याने मजूरांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुस्त वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कधी जागे होणार आणि बिबट्याचा बंदोबस्त करणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्यातून केला जात आहे.

गुरूवारी किरपेत मुलावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर शुक्रवारी दक्षिण तांबवे येथे बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर शनिवारी आज दि. 22 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास किरपे येथे ज्या परिसरात मुलावर बिबट्याने हल्ला केला. त्याच परिसरातील सुतारकी येथे संतोष तिकवडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. तेव्हा चक्क ऊसतोड मजूराच्या समोर ऊसात बिबट्या शिरला, त्यामुळे मजुरांनी ऊसतोड बंद केली आहे. तसेच ऊसात बिबट्या तर बाधांवर ऊसतोड आणि वनविभाग झोपेत अशी परिस्थिती दिसून येत आहे.

कराड तालुक्यातील तांबवे, किरपे, येणके परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला सापळा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे. तरीही सापळा लावण्याची परवानगी घेण्याच्या कारणापासून रडगाणे सुरू करणारे वनविभाग झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे. येणके येथे 5 वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर किरपेत दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर हल्ला तरीही वनविभाग म्हणते आम्हांला बिबट्या दिसत नाही. या वनविभागाच्या कार्यशैलीमुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे.

Leave a Comment