पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये पळून जाऊन लग्न करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून या तरुणावर पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रघू तिवारी असे हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील सैती फैल येथील रहिवासी आहे. जखमी रघूचे मागच्या काही वर्षांपासून गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होतं. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता. यानंतर रघुने पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे याबाबत जबाब नोंदवण्यासाठी रघू पोलीस ठाण्यात गेला होता. जबाब नोंदवल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी रघूशी पोलीस ठाण्याच्या बाहेर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर हा वाद एवढा वाढला कि मुलीच्या नातेवाईकांकडून रघूवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी धारदार शस्त्राने रघूच्या पोटात वार केले.

या हल्ल्यामध्ये रघू गंभीर जखमी झाला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात हि घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने रघुला खामगाव येथील रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर रघुच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.