सांगली | सांगली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असली तरी तब्बल 266 रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याचे स्पष्ट झाले. तर 2 हजार 241 जण ऑक्सिजनवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चोवीस तासात 1 हजार 354 रुग्ण आढळून आले. मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले असून दिवसभरात 45 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 306 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 200 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 98, कडेगाव 107, खानापूर 88, पलूस 62, तासगाव 94, जत 238, कवठेमहांकाळ 81, मिरज 215, शिराळा 35 आणि वाळवा तालुक्यात 136 रुग्ण आढळले.
मागील तीन दिवसांपासून नवी रुग्णसंख्या स्थिर असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले. तब्बल 266 रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याचे स्पष्ट झाले. तर 2241 जण ऑक्सिजनवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 4 हजार 870 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 1739 पैकी 580 बाधित तर 3131 अँन्टीजेन चाचणीमध्ये 839 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1354 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 45 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 6 आणि मिरज शहर 6, जत व मिरज तालुक्यात प्रत्येकी 6, खानापूर 5, कडेगाव, पलूस आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी 4, आटपाडी 2, कवठेमहांकाळ व शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1306 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण वाढले. नव्याने 200 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 117 तर मिरज शहरात 83 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 98, कडेगाव 107, खानापूर 88, पलूस 62, तासगाव 94, जत 238, कवठेमहांकाळ 81, मिरज 215, शिराळा 35 आणि वाळवा तालुक्यात 136 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 19, सोलापूर 16, कर्नाटक 19, सातारा जिल्ह्यातील 5, पुणे 4 आणि अकोला जिल्ह्यातील 2 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 96 हजार 413 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 787 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 76 हजार 292 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 17 हजार 334 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 14 हजार 59 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.