कराड । गोळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत तत्कालीन संचालक मंडळ, व्हा. चेअरमन, बँक विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर तसेच सोसायटीस सॉफ्टवेअर पुरवणारी रूबीकॉन कंपनी यांनी गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने दस्तऐवजात फेरफार करून सुमारे 27 लाखाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत लेखापरिक्षक संपत आनंदा शिंदे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, तत्कालीन संचालक मंडळ, व्हा. चेअरमन, बँक विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर तसेच सोसायटीस सॉफ्टवेअर पुरवणारी रूबीकॉन कंपनी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिल बाळासो जाधव, संदीप शंकर कदम, शशिकांत वसंत पवार, पांडुरंग खाशाबा माने, मधुकर शिवाजी साळुंखे, सतिश बबन देसाई, आबासो तातोबा जाधव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत अनिल जाधव, संदीप कदम, शशिकांत पवा, पांडुरंग माने, मधुकर साळुंखे, सतिश देसाई, आबासो जाधव यांनी संगणमताने स्वतःच्या फायद्यासाठी तत्कालीन संचालक मंडळ, व्हा. चेअरमन, बँक विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर तसेच सोसायटीस सॉफ्टवेअर पुरवणारी रूबीकॉन कंपनी यांना हाताशी धरून फसवणूक व गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने दस्तऐवजात फेर फार करून कर्ज विभागत सन 2017-18 ते सन 2019-20 मध्ये 21 लाख 16 हजार एक रूपये व धान्य रॉकेल विभागात सन 2017-18 ते 2021-22 कालावधीत रोजकिर्दीवरील 6 लाख 13 हजार 195 रूपये असा एकूण 27 लाख 29 हजार 196 रूपयांचा अपहार केला असून याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळ, व्हा. चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गोळेश्वरचे बँक विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर तसेच सोसायटीस सॉफ्टवेअर पुरवणारी रूबीकॉन कंपनी कराड यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.