आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणानं घराजवळ राहणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हि चार वर्षांची पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. यावेळी 28 वर्षीय आरोपी पीडित मुलीला एकटं खेळताना पाहून तिच्याजवळ आला.त्याने चिमुरडीला आइसक्रीम देण्याच्या बहाण्याने आडबाजूला नेले. याठिकाणी कोणी बघत नसल्याचे पाहून आरोपीने चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी घरी आल्यानंतर हि घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईनं मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात 28 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका पोलीसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत अवघ्या काही तासांतचं आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत.