मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24 तासाच्या आत 295 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील 132 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही केवळ एकच रुग्ण आढळला आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळले असून सध्या 67 रुग्णांवर उपचार सुरू असून, एका कोरोना बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.

लातूर जिल्ह्यात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या दोन हजार 405 वर आली असून कोरोनाचे नवे 14 रुग्ण आढळले आहे. परभणी जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसून 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यात 11नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 20 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात 75 नवीन रुग्णांची भर पडली असून दिवसभरात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. या जिल्ह्यातही मृत्यूची नोंद नाही.

You might also like