पालघरमध्ये भूकंपाचा धक्का; 3.6 रिश्टर स्केलच्या धक्क्याने नागरिक भयभीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर येथे आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी झालेल्या भूकंपामुळे डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसर हादरून गेला. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

पहाटेच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे सुदैवाने कोणत्या प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले असून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.