सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील एका सराईत मोटारसायकल चोरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्याच्याकडे असलेल्या एकूण ३ मोटारसायकल जप्त कऱण्यात आल्या आहे. प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक सातारा असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हा चोरटा जेल मधून सुटला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोरीच्या मोटारसायकली बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस स्टाफ माहिती घेत असताना एक सराईत मोटारसायकल चोरटयाकडे एक विना नंबर प्लेटची मोटारसायकल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सदर चोरटयास पोलीसांनी ताब्यात घेतले.
सदरचा चोरटा काही दिवसापूर्वीच मोटारसायकल चोरीच्या गुन्हयामध्ये जेलमधून सुटलेला असून त्याचे नाव प्रल्हाद शिवाजी पवार (रा. अजंठा चौक सातारा) असे आहे. त्यास ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे तीन मोटारसायकली असल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन मोटारसायकली सातारा शहरातून चोरी केल्या असल्याचे तपासामध्ये दिसून आलेले आहे. तसेच अन्य एका मोटारसायकल कोठून चोरी केली याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, अजयकुमार बन्सल, मा अपर पोलीस अधिक्षक सो. अजय बो-हाडे, मा. श्री. मोहन शिंदे पोलीस उपअधिक्षक, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश घाडगे यांनी केलेली आहे.