मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (actor arun bali) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली (actor arun bali) यांनी ‘केदारनाथ’, ‘ 3 इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Veteran actor Arun Bali passes away at the age of 79 years in Mumbai
— ANI (@ANI) October 7, 2022
ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (actor arun bali) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांना Myasthenia Gravis हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती सतत ढासळत होती. काल अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली (actor arun bali) यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांपासून बॉलिवूड कलाकारापर्यंत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अरुण बाली (actor arun bali) यांचा जन्म 23 डिसेंबर 1942 मध्ये लाहोर, पाकिस्तान येथे झाला होता. बाली यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर त्यांनी तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आपला ठसा उमठवला आहे. अरुण बाली यांनी ‘3 इडियट्स’, ‘पीके’, ‘रेडी’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘केदारनाथ’, ‘जमीन, ‘सौगंध’, ‘जंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’ आणि ‘पानिपत’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय