बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बाळासाहेबांची शिवसेना गटात इन्कमिंग सुरूच आहे. गजानन कीर्तिकर यांच्या सारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (pratap jadhav) यांनी केला आहे.
गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावाच खासदार प्रतापराव जाधवांनी (pratap jadhav) केला आहे.
मागच्यावेळीदेखील खासदार जाधव (pratap jadhav) यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर काही दिवसांत खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. यानंतर आता खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा खरा ठरतो कि काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्यांचा हा दावा खरा ठरला आणि ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील झाले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय