सावधान!! Mobile चा नाद लय बेकार; प्रत्येकी 4 पैकी 3 भारतीयांना NoMophobia चा आजार

NOMOPHOBIA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय राहू शकेल असा व्यक्ती जगात सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोबाईलच्या आहारी गेल्याच आपण पाहिले असेल. त्यातच आता स्मार्टफोनशी संबंधित एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. दर 4 व्यक्तींपैकी 3 व्यक्तीना नोमोफोबिया (NOMOPHOBIA) नावाचा आजार आहे. या लोकांना मोबाईल पासून लांब जाण्याची किंवा मोबाईल जवळ नसल्याची भीती वाटते.

ओप्पो आणि काउंटरपॉईंट रिसर्चने याबाबत एक अहवाल शेअर केला असून रिपोर्टनुसार, प्रत्येक 4 पैकी 3 भारतीयांना नोमोफोबिया नावाचा आजार आहे. मोबाईल फोनची बॅटरी 20% वर पोहोचताच सुमारे 72% भारतीयांना ‘लो बॅटरी चिंता’ होते. तर दुसरीकडे, 65% लोक असे आहेत की यामुळे चिंता, संपर्क तुटणे, असहाय्य वाटणे, बाहेर जाण्याची भीती, चिंताग्रस्तपणा इत्यादी इमोशनल अस्वस्थता सुरू होते. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या काही समस्या जाणवत असतील तर समजून घ्या की तुम्ही पण NOMOPHOBIA ग्रस्त आहात.

नोमोफोबिया म्हणजे नेमकं काय ?

नोमोफोबिया म्हणजेच नो मोबाईल फोन फोबिया… याचा अर्थ की, एखाद्या व्यक्तीजवळ मोबाईल नसेल तर भीती किंवा चिंताग्रस्त होणे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनात कायम अशी भीती राहणे की, आपला मोबाईल आपल्यापासून लांब जायला नको. मोबाईल जवळ नसल्यास बैचेनी होणं, दर 5 मिनिटांनी मोबाईल चेक करणे, नेटवर्क नसलं कि चिंताग्रस्त होणं हे नोमोफोबियाचे लक्षण आहे.

नोमोफोबिया वर उपाय काय ?

नोमोफोबिया वर उपाय म्हणजे स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवणं
मोबाईलचा जास्त वापर न करणे
लोकांशी सतत चर्चा करणे
पुस्तके किंवा वृत्तपत्रे वाचणे
स्वतःला कामात व्यस्त ठेवा
योगा करा
कुटुंबातील लोकांशी वेळ घालवा