सातारा जिल्ह्यातील 3 टोळीप्रमुख 2 वर्षांसाठी तडीपार

Satara police News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी, जबरी चोरी, घरातघुसून मारहाण करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळीतील तिघांविरोधात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपारीची आदेश दिले आहेत.

यामध्ये टोळीप्रमुख सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, (वय 23, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा ता. जि. सातारा), ओंकार रमेश इंगवले, (वय 27, रा. देशमुख कॉलनी करंजे पेठ, सातारा ता. जि. सातारा), मंदार हणमंत चांदणे, (वय 32, रा. 741, गुरुवार पेठ, सातारा ता. जि. सातारा अशी नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, ओंकार रमेश इंगवले आणि मंदार हणमंत चांदणे या तिघांवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्याकडून सर्व सामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान केले जात होते. संबंधितांना सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. म्हणून या तिघांविरोधात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. श्री. निकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी एम. डी. शिंदे यांनी करुन त्याचा अहवाल हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला होता. यावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधितांना दोन वर्षाकरीता सातारा जिल्हा हद्दीतून तडीपार होण्याचे आदेश दिले.

नोव्हेंबर 2012 पासून उपद्रवी टोळयांमधील 16 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. या कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद खायत, पो.कॉ. वेतन शिंदे, पो. कॉ. अनुराधा गणस यांनी पुरावा सादर करता या कारवाईचे सर्व स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.