हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्या अनेक बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सचे दर वाढवले जात आहेत. RBI कडून ऑगस्टमध्ये रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली. SBI सारख्या मोठ्या बँकांकडून FD वर 5.65% पर्यंत व्याजदर दिला जात आहे. तर, HDFC बँकेकडून 6.10% पर्यंत, ICICI बँकेकडून 6.10% पर्यंत , Axis बँकेकडून 6.05% पर्यंत आणि PNB कडून जास्तीत जास्त 6.10% व्याजदर दिला जात आहे.
FD बरोबरच अनेक लहान बचत योजना देखील बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. या वाढत्या व्याजदराच्या काळात बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सपेक्षा लहान बचत योजना जास्त चांगल्या आहेत कारण त्यामध्ये FD च्या स्थिर व्याजदरांच्या विरूद्ध त्रैमासिक व्याजदरात सुधारणा केली आहे. Post Office
मात्र, हे सर्व व्याजदर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF) आणि सुकन्या समृद्धी यासारख्या व्यापकपणे लोकप्रिय असलेल्या लहान बचत योजनांपेक्षा खूपच कमी आहेत.
सुकन्या समृद्धी खाते (SSA)
मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करण्यासाठी सुकन्या समृद्धी खाते (SSA) ही सर्वात लोकप्रिय असलेली एक छोटी बचत योजना आहे. SSA मध्ये आता प्रतिवर्ष 7.6% दराने चक्रवाढ व्याज दर दिला जात आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर SSA खाते उघडण्यासाठी, पालकाला किमान 25 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये एका आर्थिक वर्षात गुंतवता येतात. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळते. Post Office
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक नेहमीच सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असतात. कारण त्यांना बँकेच्या FD पेक्षा जास्त रिटर्न हवा असतो. सहसा, ज्येष्ठ नागरिकांकडून बचत योजनांची (SCSS) निवड केली जाते. सध्या, SCSS मध्ये दर वर्षी 7.4% व्याज दराची ऑफर दिली जाते जे तिमाही आधारावर दिले जाते. सध्याच्या काळात SCSS वर बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याजदर मिळतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना वैयक्तिकरित्या किंवा जोडीदारासोबत SCSS मध्ये खाते उघडता येते. Post Office
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF)
गुंतवणूकदारांमध्ये PPF देखील लोकप्रिय आहे. त्यावरील व्याज आणि मॅच्युरिटीच्या रक्कमेवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. PNB, BoB, Axis, SBI, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इतर अनेक बँकांच्या FD च्या व्याजदरांच्या तुलनेत PPF मध्ये 7.1% प्रतिवर्ष (वार्षिक चक्रवाढ) मिळते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा
PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या
HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा
Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!