हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पालघर जिल्ह्याच्या वसईजवळ मुंबई लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) धडक दिल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही रेल्वे कर्मचारी त्यावेळी सिग्नलशी संबंधित काम करत होते. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. सध्या या संपूर्ण घटनेमुळे रेल्वे विभागावर ताशेरे ओढले जात आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य सिग्नल निरीक्षक वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर सोमनाथ उत्तम लांबुत्रे, मदतनीस सचिन वानखडे अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे तिन्ही कर्मचारी सोमवारी संध्याकाळी काही सिग्नल पॉइंट्सच्या दुरुस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी, भरधाव वेगाने येणाऱ्या लोकल ट्रेनने कर्मचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या घडलेल्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातला 55 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आले आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षीच लोकल ट्रेनच्या दोन बोगींच्या गॅपमध्ये पडल्यामुळे एका महिलेचा ट्रेन खाली आल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता रेल्वे विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.