Smartphone च्या स्पीकरमध्ये साचली आहे घाण, ‘या’ 3 Tricks वापरून करा साफ

Smartphone
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल काळात Smartphone हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सतत काही ना काही कारणाने आपल्या हातात फोन असतोच. तसेच आजकाल बँकेच्या कामांपासून ते शॉपिंगपर्यंतची अनेक कामे देखील याद्वारे घरबसल्या अगदी सहजरीत्या केली जातात. अशा परिस्थितीत दररोज स्मार्टफोन वापरताना त्याच्या काही भागांमध्ये धूळ आणि घाण जमा होते. तर स्मार्टफोनमधील स्पीकरमध्ये सर्वाधिक धूळ आणि घाण साचली जाते. मात्र जर आपण योग्य पद्धतीने ते साफ केले नाहीत ते खराब होण्याची शक्यता देखील असते. तर आज आपण आपल्या फोनच्या स्पिकरमध्ये जमा झालेली घाण कशी स्वच्छ करायची ते जाणून घेऊयात…

How to Clean iPhone Speakers Without Damaging Them

थिनरचा वापर करा

हे लक्षात घ्या कि, आपल्या Smartphone चा स्पीकर थिनरनेही स्वच्छ करता येऊ शकतो. यासाठी आपल्याला एक टूथब्रश घ्यावा लागेल. यानंतर टूथब्रशने स्पीकरवर थिनर लावावे लागेल. थिनरने आपल्या फोनच्या स्पीकरमधील घाण सहजपणे साफ होते. मात्र, आपल्याला थिनरचा वापर करताना थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण जर जास्त प्रमाणत थिनर वापरल्याने आपल्या फोनचे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे स्पीकर साफ करताना कमीत कमी थिनरचा वापर करावा. तसेच याच्या अतिवापरामुळे मदरबोर्डचे देखील नुकसान होण्याची शक्यता असते.

How to Clean Your Smartphone Speaker - Phonebox

कॉटनचा वापर करून स्वच्छ करा

कॉटनने देखील आपल्या Smartphone चा स्पीकर सहजरित्या साफ करता येतो. यासाठी स्पीकरच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकेल अशा वस्तूवर कॉटन लावा. तसेच कॉटनवर थोडे थिनर लावले तर स्पीकर पूर्णपणे स्वच्छ होऊ शकेल.

How To Clean iPhone Speakers – 8 Tips You Must Know!

Earbuds देखील उपयुक्त ठरतील

Earbuds चा वापर साधरणतः कान साफ करण्यासाठी केला जातो. मात्र याद्वारे आपल्या Smartphone चा स्पीकर देखील स्वच्छ करता येऊ शकतो. मात्र असे करत असताना त्यावर जास्त दाब दिला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण असे केल्याने आपला स्पीकर बंद पडू शकतो.

हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक