पाचगणी | एका 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी समीर पाटील याने दि. 18 मे 2018 पासून जानेवारी 2022 या कालावधीत फिर्यादी महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून पाचगणी, मनोरी- मालाड, मोशी पुणे येथे तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे संबंधित महिला गरोदर राहिली. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला.
या प्रकारानंतर महिलेने समीरला लग्नाबाबत विचारले असता त्याने शिवीगाळ केली. यावरून समीर पाटील याने आपली फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. तेव्हा महिलेने मेघवाडी (मुंबई) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा पाचगणी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महामुलकर करत आहेत.