हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवलय जात आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील मिळू शकतात. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना वृद्ध आणि लहान/अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना (SMF) सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरु केली गेली आहे. ही एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, लाभार्थ्याला सरकारकडून 3,000 रुपये पेन्शन दिली जाईल. मात्र यासाठी शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल.
याबरोबरच जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर या शेतकऱ्याच्या पत्नीला कुटुंब यातील 50% रक्कम पेन्शन (Pension Scheme) म्हणून दिली जाईल. मात्र ही फॅमिली पेन्शन फक्त जोडीदारासाठीच लागू असेल. तसेच शेतकऱ्याची मुले या योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र ठरणार नाहीत. चला तर मग या योजनेचा लाभ कसा घ्यावा ते जाणून घेउयात….
PM Kisan Mandhan Yojana म्हणजे काय ???
PM Kisan Mandhan Yojana ही केंद्र सरकारची योजना आहे. या अंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद केली गेली आहे. यामध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला सहभागी होता येईल. या योजने अंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 3000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन दिली जाईल. यासाठीचे योगदान दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे. मात्र हे योगदान यामधील सदस्याच्या वयावर अवलंबून असेल. Pension Scheme
पीएम किसानच्या हप्त्यातून पैसे कापले जाणार
हे जाणून घ्या कि, पीएम किसान अंतर्गत, केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर शेतकरी पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाला तर यासाठीचे रजिस्ट्रेशन अगदी सहजपणे होईल. तसेच या पेन्शन योजनेमध्ये दरमहा कपात करावयाचे योगदानही या 3 हप्त्यांमध्ये मिळालेल्या रकमेतून कमी केले जाईल. Pension Scheme
फायदा कसा मिळेल ???
PM Kisan Mandhan Yojana मध्ये कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 200 रुपये दरमहा योगदान द्यावे लागेल. जर गणना केली तरी जास्तीत जास्त 2400 रुपये आणि कमीत कमी रुपये 660 योगदान होईल. तसेच 6000 रुपयांमधून 2400 रुपये योगदान वजा केले तरी पीएम सन्मान निधी खात्यामध्ये 3600 रुपये जमा होतील. त्याच वेळी, वयाच्या 60 नंतर, दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. त्याच वेळी, 2000 चे 3 हप्ते देखील येत राहतील. वयाच्या 60 नंतर, वार्षिकरित्या 42,000 रुपये मिळतील Pension Scheme
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkmy.gov.in/
हे पण वाचा :
आता एकही पैसा न देता Netflix वर पाहता येणार आपल्या आवडीचे कंटेंट
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर
Stock Market : येत्या काळात ‘या’ सेक्टर्समधील शेअर्स देऊ शकतील जबरदस्त रिटर्न
SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज
Sukanya Samriddhi Yojana : अवघ्या 2 दिवसांत उघडली 11 लाख खाती, ‘या’ सरकारी योजनेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवले पैसे