31 March 2024 Deadline | आर्थिक वर्षे संपण्यास थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. 31 मार्च ही आर्थिक कामांसाठीची शेवटची तारीख असते. त्यामुळे जर तुमची गुंतवणूक, टॅक्स सेविंग सारख्या अनेक गोष्टी करायच्या असतील, तर त्या ३१ मार्च आधीच करून घ्या. आता या कामांसाठी डेडलाईन (31 March 2024 Deadline) आहेत. 31 मार्चपूर्वी ही सगळी कामे करून घेतली नाहीत तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.
आयटीआरची डेडलाईन
31 मार्च 2021 22 साठी अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्यांना कर द्यायचा आहे आणि ज्यांनी आर्थिक वर्ष 2020- 21 साठी रिटर्न फाईल केली नाहीये. ते लोक 31 मार्चपर्यंत ही रिटर्न फाईल करू शकतात.
कर वाचवण्याची शेवटची संधी
तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली असेल तर ही 31 मार्च तुमच्याकडे कर वाचवण्याची शेवटची संधी आहे. 2023- 24 साठी कर सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ आहे. त्यामुळे तुम्ही 31 मार्चपर्यंत बचत योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. त्याचप्रमाणे पीपीएफ, एसपीएस, इक्विटी लिंक सेविंग स्कीम आणि एसबीआय सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून देखील कर वाचू शकता.
मिनिमम डिपॉझिट | 31 March 2024 Deadline
तुम्ही जर पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर यामध्ये किमान गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे. या बचत योजनेत किमान गुंतवणुकीसाठी तुम्हाला मिनिमम डिपॉझिट भरावे लागेल. जर तुम्ही मिनिमम डिपॉझिट ठेवले नाही. तर तुमचे खाते डिफॉल्ट होईल खाते सुरू करण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात दंड भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही जर या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला कर सवलत मिळेल.
तुमच्या कारमध्ये फास्टटॅग असेल तर 21 मार्चपूर्वी तुम्ही त्याचे केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नसेल तर 31 मार्चनंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅग केवायसी अपडेट करणे अनिवार्य केलेले आहे. 31 मार्चपर्यंत तुमचा फास्टटॅग केवायसी केलेला नसेल तर तुमचा फास्टटॅग निष्क्रिय होऊ शकतो.




