हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला पसंती देतात. त्यामुळे गोवा हे पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेकांनी थर्टी फस्टसाठी कोकणसह गोव्याचेही तिकीट बुक केले आहे. त्यासाठी वंदे भारतसह इतर रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणचे रेल्वे गाड्याचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ही टक्केवारी 125 टक्क्यांच्याही पूढे गेली आहे. त्यामुळे याचा फायदा हा रेल्वेला झाला आहे.पसंती दिलेल्या यां गाड्या कोणत्या त्याबाबत जाणून घेऊयात.
कोणत्या गाड्यांस दिली पसंती?
आपल्या कुटुंबासोबत कोकण व गोवा फिरायला जाण्यासाठी रेल्वेसोबतच इतरही प्रवासाचे पर्याय असताना बऱ्याचजणांनी रेल्वेच्या विशेष गाड्यांना पसंती दिली आहे. त्यामध्ये वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी याबरोबरच विशेष चालवण्यात येणाऱ्या गाड्यांनाही प्रवाश्यांनी पसंती दिली आहे. त्यामध्ये नागपूर मडगाव रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-थिवीम दरम्यान चालवण्यात येणारी ट्रेन, पुणे-करामाळी, पनवेल-करमाळी यां गाड्यांचा समावेश आहे.
कोणत्या गाड्यांचे किती झाले बुकिंग?
बुकिंग झालेल्या गाड्यांमध्ये वंदे भारतचे 137 टक्के , तेजस एक्सप्रेस 122 टक्के , तर जनशताब्दीचे 120 टक्क्यावर बुकिंग झाले आहे. तसेच विशेष गाड्यांमध्ये नागपूर मडगाव रेल्वे 139 टक्के , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-थिवीम दरम्यान चालवण्यात येणारी ट्रेन 95 टक्के , पुणे-करामाळी 124 टक्के, तर पनवेल-करमाळी यां गाडीचे बुकिंग हे 110 टक्के एवढे आगाऊ बुकिंग झाले आहे.
वंदे भारतसह तेजस आणि जनशताब्दी गाडीस प्रवाश्यांची पसंती
वंदे भारत ट्रेन ही देशातील सुपरफास्ट ट्रेन आहे. अत्यंत कमी कालावधीत यां गाडीने प्रवाश्यांच्या मनात घर केले आहे. मात्र असे जरी असले तरी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वंदे भारत सोबत तेजस आणि जनशताब्दी या गाडीसही पसंती दर्शवण्यात आली आहे. त्यामध्ये 20 डिसेंबरला वंदे भारतचे बुकिंग ही 98 टक्के, तेजसची 93 टक्के तर जनशताब्दीची 88 टक्के एवढी झाली आहे. 21 डिसेंबरला वंदे भारत 99 टक्के आणि तेजस रेल्वेची 90 टक्के बुकिंग करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला वंदे भारतचे बुकिंग 92 टक्के तर तेजसची 83 टक्के बुकिंग करण्यात आली आहे. 23 डिसेंबरला वंदे भारत 137 टक्के, तेजसची 122 टक्के तर जनशताब्दीची 105 टक्के. 24 डिसेंबरला वंदे भारत 116 टक्के, तेजस 110 टक्के तर जनशताब्दी 110 टक्के. 25 डिसेंबर रोजी वंदे भारत 107 टक्के, तेजस 107 टक्के आणि जनशताब्दी 105 टक्के. 26 डिसेंबर वंदे भारत 107 टक्के, तेजस 105 टक्के, जनशताब्दी 108 टक्के. 27 डिसेंबरला वंदे भारत 110 टक्के, तेजस 106 टक्के आणि जनशताब्दीचे 101 टक्के बुकिंग करण्यात आले आहे. तर 28 डिसेंबर रोजी वंदे भारतचे 114 टक्के, तेजस ट्रेनचे 104 टक्के तर जनशताब्दीचे 98 टक्के आगाऊ बुकिंग करण्यात आले. या बुकिंगमुळे नक्कीच रेल्वेला याचा फायदा होणार आहे.