हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hallmarking of Gold : केंद्र सरकारकडून आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. यावर्षी 1 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांचा हॉलमार्किंग करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामधील पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स स्थापन करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या एकूण 288 जिल्ह्यांची यादी आता BIS च्या www.BIS.GOV.IN वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर येत्या काळात देशातील सर्व जिल्हे या सुविधेद्वारे जोडले जातील, असेही ग्राहक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
हे लक्षात घ्या कि, हॉलमार्किंग हा महागड्या धातूच्या शुद्धतेचा पुरावा आहे. 16 जून 2021 पर्यंत ते ऐच्छिक होते. मात्र त्यानंतर सरकारकडून टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग (Hallmarking of Gold) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्हे त्याच्या कक्षेत आणण्यात आले.
हॉलमार्किंगबाबत सरकार कठोर
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, तीन अतिरिक्त कॅरेट (20, 23 आणि 24 कॅरेट) सोन्याचे दागिन्यांव्यतिरिक्त, 32 नवीन जिल्हे अनिवार्य हॉलमार्किंगच्या (Hallmarking of Gold) दुसऱ्या टप्प्याच्या कक्षेत आले आहेत, जिथे पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, तेथे एक ‘चाचणी आणि हॉलमार्क सेंटर (AHC)’ स्थापन करण्यात आले आहे.
आता ग्राहकांना मिळणार ‘या’ सर्व सुविधा
सोन्याच्या हॉलमार्किंगचे (Hallmarking of Gold) नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. जे ग्राहकांना लागू होणार नाहीत. यापुढे कोणत्याही ज्वेलर्सना हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. मात्र ग्राहकांना अजूनही आपले जुने दागिने हॉलमार्किंगशिवाय ज्वेलर्सला विकता येतील. म्हणजेच आता घरामध्ये असलेले आपले हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करून घेण्याबाबत काळजी करायची गरज नाही. जुने सोन्याचे दागिने हा ज्वेलर्ससाठी एक प्रकारचा कच्चा माल आहे. ग्राहक स्वतः आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करू शकणार नाही.
अधिकृत आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये 8.68 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग (Hallmarking of Gold) करण्यात आले होते. तर 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत 37 कोटी हॉलमार्किंग करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bis.gov.in/index.php/hallmarking-overview/?lang=en
हे पण वाचा :
गेल्या 23 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर तपासा
Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या
Aadhaar Card मधील मोबाईल नंबर कसा बदलायचा ते जाणून घ्या !!!
LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या