हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी करोडोंचे ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक इसम मुंब्रा येथील असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून गुजरातमध्ये ड्रग्जची जप्ती सुरू आहे.
पोलिसांनी प्रथम ड्रग्जची 19 छोटी पाकिटे जप्त केली. यानंतर आरोपीच्या घरातून 47 मोठी पाकिटे जप्त करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 50 किलो मेफेड्रोन आणि 16 किलो हेरॉईन पकडण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 350 कोटी रुपये आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
विविध स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देवभूमी द्वारका पोलिसांनी खंभलिया महामार्गावरील आराधना धाममधून ड्रग जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज समुद्रमार्गे गुजरातमध्ये आणण्यात आले. मुंद्रा येथून जप्त केलेले हजारो किलो हेरॉइनही समुद्रामार्गे राज्यात आणण्यात आले होते.