Wednesday, October 5, 2022

Buy now

अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो..कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात फटाके फुटत आहेत पण, मुख्य फटाका कधी फुटणार हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्य माफियांच्या हातात गेलंय हे स्पष्ट झालं आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राज्यातील राजकिय आरोप प्रत्यारोपांवर आपलं मत मांडले आहे. NCP – BJP मध्ये जे भांडण लागलं आहे, त्यामधून या पक्षांतील काही लोकांचं चारित्र्य लोकांसमोर येत आहे. राजकारणाकडे पूर्वी सेवा म्हणून बघितलं जात होतं. आता ते कमर्शिअल झालं आहे असं आंबेडकर यावेळी म्हणालेत.

तसेच अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या कुटुंबाला विनंती आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका असं आवाहन आंबेडकर यांनी देशमुख यांना केले आहे. पैशांचं कलेक्शन झालं हे आता उघड आहे. ते पैसे देखमुखांकडे सापडत नाहीत मग ते कोणाकडे पोहोचवले? हे त्यांनी उघड करावं व माफीचा साक्षिदार व्हावं असंही आंबेडकर म्हणालेत.

तसेच, राज्याला लुटण्याचा मार्ग म्हणूनच राजकारण चालू आहे. या परिस्थितीत कोर्टाची भूमिका सर्वात महत्वाची असणार आहे. त्यांनी प्रकरणं लटकत ठेऊ नये, निकाल द्यावा. यामुळे राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण लोकांसमोर येईल आणि कुठेतरी याला आळा घालता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.