कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, महाबळेश्वर या याठिकाणी पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. तर कोयना धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 38.48 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 123 मिलिमीटर, नवजा येथे 142 तर महाबळेश्वर येथे 136 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 38.48 (36.56 टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. संततधार पाकसामुळे धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 40 हजार 962 क्युसेक पाण्याची आकक होत आहे.
#सातारा जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी…
#rain
#satara
#Mansoon @MahaDGIPR
@InfoDivPune pic.twitter.com/duecqy1vZT— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 13, 2022
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कोयना धरणासह अनेक भागात समाधानकारक हजेरी लावली आहे. ढेबेवाडी विभागातील महिंद धरण अोव्हर फ्लो झालेले आहे. तर पाटण विभागात काही भागात भूस्खलन होण्याच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
#सातारा जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल pic.twitter.com/uiphW0rnbj
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 13, 2022
पाटण तालुक्यातील संबंधित विभागातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत उपाययोजनाही केल्या जात आहेत. दरम्यान तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागही अलर्टमोडवर आहे.