औरंगाबाद – औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आलेला 39 किलो गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने काल सकाळच्या सुमारास पकडला. यासोबतच एक पुरुष व दोन महिलांना ही अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एका दिवसाची कोठडी देण्यात आली.
उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल सूर्य तळ यांना रेल्वेस्थानकावर आंध्रप्रदेशातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती बातमी दाराकडून समजली यानंतर निरीक्षक गीता बागवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व परवानग्या मिळवत सापळा रचला यानुसार एक पुरुष व दोन महिला नऊ वाजता रेल्वे स्थानकातील पार्किंग मध्ये प्रवासी बॅग्स दाखल झाले त्यांच्याकडे चार बॅग होत्या या सर्व भागांची झाडाझडती घेतली असता प्लास्टिकच्या आवरणामध्ये 19 पाकिटे आढळून आली त्यात एकूण 40 किलो गांजा आढळला या कांद्याची एकूण किंमत दोन लाख 73 हजार इतकी आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोविंदा मनी आरली (38), लाऊ अम्मा रामू आरली (40) आणि मनय्या अप्पाराव पिल्ले (30, सर्व रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांचा समावेश आहे.
ही कारवाई निरीक्षक बागवडे, सहाय्यक निरीक्षक सूर्यतळ, हवालदार लांडे पाटील, नाईक आयुब पठाण, विश्वनाथ गंगावणे, अंमलदार आशरफ सय्यद, ज्ञानेश्वर कोळी, योगेश गुप्ता, सतीश जाधव, प्रकाश सोनवणे, कोमल निकाळजे यांच्या पथकाने केली.