अकोला : हॅलो महाराष्ट्र – पोलिसांनी अकोल्यातील सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये चौघांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीक एक कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली. यामध्ये एक महिला घरामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील मुली बोलवून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपींसह काही मोबाईल फोन आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
उरळ पोलीत ठाण्यात गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निमकर्दा या ठिकाणी एका महिलेच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या कुंटणखान्यावर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या पथकाने सापळा रचून छापेमारी केली. या छापेमारीमध्ये चौघांना रंथेहाथ पकड्यात पोलिसांना यश आले. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कुंटणखाना चालवला जात होता.
बाहेरच्या जिल्ह्यातून आणल्या जात होत्या मुली
अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनिय कलम 3, 4, 5 पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी केली जात आहे. देहविक्री (Sex Racket) करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून मुली मागवल्या जात होत्या.
सेक्स वर्क प्रोफेशन
सुप्रीम कोर्टानं नुकताच सेक्स वर्क हे एक प्रोफेशन असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. संमतीनं जर प्रौढ व्यक्ती सेक्स वर्कचं काम करत असेल, तर अशा सेक्स वर्क्सना अटक करुन नये, तसंच त्यांना त्रास देऊ नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र देहविक्रीचा व्यवसाय चालवणं हे बेकायदेशीरच असेल, असेदेखील सुप्रीम कोर्टाने यावेळी स्प्ष्ट केले आहे.
हे पण वाचा :
म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..
IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन
ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…
राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल