Stock Market : ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक !!!

Recession
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : सलग 8 दिवस वाढ झाल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली. आज ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 651.85 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 59,646.15 वर बंद झाला. तर निफ्टी 229.30 अंकांनी किंवा 1.28 टक्क्यांनी घसरून 17,727.20 वर बंद झाला. आज मिडकॅप, स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर होता. आज रियल्टी, बँक आणि एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली तर आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

Stock Market Crash - Overview, How It Happens, Examples

एका मीडिया रिपोर्ट नुसार, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की,” निफ्टीमध्ये जूनच्या नीचांकी पातळीपासून 18% वाढ झाली आहे. सध्या, काही नफा-वसुली आणि निश्चित उत्पन्नामध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे घट झाली आहे.” विजय कुमार पुढे सांगतात की,” याकडे अल्पकालीन धोरण म्हणून पाहिले जाऊ शकते.” चला तर मग आज बाजारात झालेल्या पडझडीमागे कोणती कारणे होती ते जाणून घेऊयात … Stock Market

US Dollar Index: What is it and How to Use it?

अमेरिकन डॉलर इंडेक्स मध्ये झाली वाढ

जवळपास दोन महिन्यांच्या कमकुवतपणानंतर आज अमेरिकन डॉलरने वेग पकडला आहे. आज तो 107.6 पर्यंत वाढला आहे. हा गेल्या एका महिन्याचा उच्चांक आहे. हे लक्षात घ्या कि, अमेरिकन डॉलरच्या वाढीचा भारतासारख्या उदयोन्मुख देशांच्या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होतो कारण यामुळे गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढू लागतात. Stock Market

A Stock Market Crash May Be Coming: 6 Metrics You'll Want to Know | The Motley Fool

आर्थिक धोरण कडक राहण्याची शक्यता आहे

मात्र RBI ला असा विश्वास आहे की त्यांच्या भागावरील व्याजदर वाढीमुळे एप्रिल महिन्यानंतर महागाई कमी होण्यास मदत झाली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेला तेथे महागाई थांबवण्याचा विश्वास नाही. मात्र, जुलैमध्ये अमेरिकेतील किरकोळ महागाई काहीशी कमी झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या दोन सदस्यांनी 18 ऑगस्ट रोजी सांगितले की,” ते सप्टेंबरमधील बैठकीत व्याजदरात 0.75 टक्के वाढ करण्यास सपोर्ट करतील. अमेरिकेतील वाढत्या व्याजदराचा परिणाम म्हणजे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढू लागतात.” Stock Market

Windfall Taxes on Oil Companies: Sin Tax or Sin to Tax? | ORF

विंडफॉल टॅक्समध्ये वाढ

सरकारकडून डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन-इंधन (ATF) च्या निर्यातीवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय गुंतवणूकदार आणि तेल कंपन्यांसाठी आश्चर्यचकित करणारा होता. बेंचमार्क इंडेक्समध्ये सर्वाधिक वजन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान 1.3 टक्क्यांची घसरण झाली. ज्यामुळे आज निफ्टी-50 इंडेक्स मध्ये सर्वात मोठा तोटा झाला. Stock Market

How Does the Stock Market Work? Understanding the Basics

उच्च मूल्यांकन

सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही जूनमधील आपापल्या खालच्या पातळीपासून आता 18 टक्क्यांनी वाढले आहेत. यासह, भारतीय शेअर बाजार आशियातील सर्वात मौल्यवान बाजारपेठांपैकी एक बनला आहे. व्हीके विजयकुमार म्हणतात की,” उच्च पातळीचे मूल्यांकन हे बाजारात आणखी तेजीचे समर्थन करत नाही.” Stock Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com

हे पण वाचा :

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Cotton Rate : कापसाच्या दरात विक्रमी वाढ, MCX वर कापूस 50,000 रुपयांच्या वर !!!

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!