नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात काही दिवसांपूर्वी एका चार वर्षीय बालकाची हत्या (murder) करण्यात आली. हि घटना 23 नोव्हेंबरला घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या हत्येसंदर्भात (murder) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात एका चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या (murder) करण्यात आली होती. मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली असल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत कबुल केले आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला याप्रकरणी अटक कली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आलोक विशाल शिंगारे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात सोमवारी चार वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून (murder) करण्यात आला. हि हत्या नेमकी कोणी आणि का केली? याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलिस करत होते. पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असताना त्याने धक्कादायक खुलासा केला. मोठ्या भावाबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून त्याने हि हत्या (murder) केली असल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!