हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉमिनोजने पिझ्झा प्रेमींना मोठा दिलासा दिला आहे. डोमिनोजने आपल्या लार्ज साइज पिझ्झाच्या किमतीत मोठी कपात केली आहे. लहान कंपन्यांशी आणि नवीन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी डोमिनोजने लार्ज साइज पिझ्झाची किंमत 40 टक्क्यांनी कमी केली आहे. ज्यामुळे आता पिझ्झा प्रेमींना लार्ज साइज पिझ्झा स्वस्त दरात बसणार आहे.
भारतात डोमिनोज पिझ्झाचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. मात्र सध्याच्या स्थितीला ग्राहकांच्या वाढणाऱ्या मागणीमुळे आणि बदलणाऱ्या चवीमुळे अनेक नवनवीन कंपन्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे डॉमिनोजबरोबर इतर कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या पिझ्झाचा खप देखील तितकाच वाढला आहे. त्यामुळे या नवीन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी डॉमिनोजने लार्ज साइज पिझ्झाच्या किमतीत घट केली आहे. तसेच डॉमिनोजने Everyday Value & Howzzat ऑफरवर देखील मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.
डोमिनोजने लार्ज साइजच्या पिझ्झा किमतीत 40 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे आता, व्हेज लार्ज पिझ्झा 799 रुपयांऐवजी फक्त 499 रुपयांना मिळणार आहे. तसेच, डॉमिनोजच्या नॉनव्हेज लार्ज साइज पिझ्झाची किंमत 919 रुपयांवरून 549 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना लार्ज साइज पिझ्झा स्वस्त दरात मिळणार आहे. डोमिनोजने ही घोषणा फक्त आपल्या ग्राहक वर्गाचा दर टिकून राहण्यासाठी केली आहे. कारण, सध्याच्या वाढत्या महागाईमुळे डॉमिनोजचा सेल यावर्षी कमी झाला आहे.